शिष्यवृत्ती करिता कार्यपद्धती
1. शिष्यवृत्ती/ई.बी.सी अर्ज भरण्याकरीता विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे कागदपत्र तयार ठेवावी. 1. Original Income Certificate (Only for Fresh student – XI / B.A.-I, B.Com.-I /M.A.-I, M.Com.-I 2. Cast Certificate 3. Domicile Certificate 4. Aadhaar Card 5. Bank Account/Post Office Account 2. शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरावयाचे असल्यामुळे शासनाच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे. 3. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याकरीता नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांनी नेहमी नोटीस बोर्ड पाहत राहणे ही जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. 4. शिष्यवृत्तीचे /ई. बी. सी. चे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट सर्व कागदपत्रासह महाविद्यालयात जमा करावी. जोपर्यंत अर्जांची प्रिंटआऊट विद्यार्थी महाविद्यालयात जमा करणार नाही तोपर्यंत महातविद्यालयाकडून अर्ज तपासणी केल्या जाणार नाही, याची कृप्या विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. 5. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती (स्टेटस) आपण आपले अर्ज अप्रुव्ह होईपर्यंत सतत पाहत राहणे. जर विद्यार्थ्यांचे अर्ज योग्य त्या माहितीच्या व योग्य त्या कागदपत्राच्या त्रुटी अभावी रिजेक्ट झाले तर त्याची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. शिष्यवृत्ती/ ई.बी.सी. चे अर्ज जर शासनाकडून रिजेक्ट झाले तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरणे बंधनकारक आहे. 6. शिष्यवृत्तीचे / ई.बी.सी. चे पैसे हे विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट अकाऊंटमध्ये जमा होत असल्यामुळे आपण आपले बॅंक खाते किंवा पोष्ट ऑफीस खाते नेहमी पाहत राहवे. 7. ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश घेतेवेळी शिष्यवृत्तीचे / ई.बी.सी. चे अर्ज भरणार असल्यामुळे महाविद्यालयानी पूर्ण फी घेतली नाही अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे / ई.बी.सी चे अर्ज भरले नाही तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागेल, कृप्या विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्यावी.